Categories: सामाजिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव जल्लोषात मात्र ‘या’ पद्धतीने साजरा करु : उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस

अख्तर काझी

दौंड : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये प्रत्येकाला जसे हक्क दिलेले आहेत तसे जबाबदाऱ्या आणि कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत. आंबेडकर जयंती उत्सव साजरा करताना प्रत्येकाने तसे आचरण ठेवावे असे आवाहन करीत जयंती उत्सव जल्लोषात मात्र मार्गदर्शक तत्वात बसणारा उत्सव आपण आनंदात साजरा करू. पोलीस प्रशासनही त्यामध्ये सहभागी असणार आहे असे प्रतिपादन दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केले. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस स्टेशन ने आयोजित केलेल्या शांतता कमिटी बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मा.नगराध्यक्ष शितल कटारिया, महावितरणचे अभियंता देसाई,दौंड नगरपालिकेचे अभियंता घुले तसेच दौंड मधील सर्व दलित संघटनांचे पदाधिकारी, भीम अनुयायी उपस्थित होते.

राहुल धस म्हणाले की, आपले हक्क आपण प्रशासनाकडून बजावून घेतो तशाच आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य सुद्धा लक्षात घ्यावेत. मागील दोन वर्षातील कोरोना काळातील जयंती मध्ये येथील प्रत्येकाने संयम ठेवला हे कौतुकास्पदच होते. सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले आणि म्हणूनच आपण महामारीतून यशस्वीरित्या बाहेर पडलो. याला प्रशासना सहित आपणा सर्वांचेच प्रयत्न कारणीभूत आहेत. यंदाची जयंती साजरी करताना सुद्धा प्रशासनाकडून निर्बंध नाही परंतु मार्गदर्शक सूचना असतील त्या सूचना सर्व समाजाच्या स्वास्था साठीच असणार आहेत. दोन वर्षाची कसर भरून काढत जयंती जल्लोषात साजरी करावयाची आहे यात शंका नाही परंतु जल्लोष साजरा करताना कोणतेही बेकायदेशीर कृत्य कोणीही करू नये असे प्रशासनाकडून आवाहन आहे. जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमाला व मिरवणुकीला प्रशासनाचे सहकार्य असणार आहे. जयंती दिवशी दारूबंदीसाठी पोलीस प्रशासन मोठ्या जोमाने काम करणार आहे परंतु एखादी कारवाई झाल्यानंतर मात्र कोणीही मध्यस्थी साठी प्रयत्न करू नका असेही राहुल धस म्हणाले.

दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे मार्गदर्शन करताना म्हणाले की, जयंती उत्सव साजरा होत असताना कोणीही दारूचे सेवन करून उत्साहात सामील होऊ नये. दारू पिऊन येणाऱ्या लोकांमुळे जर चांगल्या उत्सवाला व आपल्या आनंदाला बाधा पोहचणार असेल तर अशा लोकांची गय केली जाणार नाही. आपणाला मागील दोन वर्ष कोरोना मुळे जयंती साजरी करता आलेली नाही,आता साजरी करण्याची वेळ आलेली आहे तर आनंदामध्ये आणि उत्सवामध्ये ती साजरी करावयाची आहे. जयंती साजरी करताना काही अडथळा येणार नाही, कोणताही चुकीचा परिणाम होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावयाची आहे. सर्वांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन करावे त्या नियोजनावरच बाकी सर्व गोष्टी अवलंबून असतात. आंबेडकर जयंती दिवशीच महावीर जयंती सुद्धा असल्याने सकाळच्या सत्रामध्ये जैन बांधवां च्या वतीने महावीर जयंती ची मिरवणूक काढण्यात येणार आहे, त्यावेळी सर्वांनी त्यांना सहकार्य करावे अशी विनंती मा नगराध्यक्ष शितल कटारिया यांनी केलेली आहे त्यामुळे त्यांच्या विनंतीचा विचार करून सर्व भीम अनुयायांनी जैन बांधवास सहकार्य करावे असे आवाहन विनोद घुगे यांनी यावेळी केले.

बैठकीमध्ये संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जयंती निमित्ताने काही सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या, त्या सर्व सूचना प्रशासनाच्या वतीने मार्गी लावल्या जातील असा शब्द यावेळी देण्यात आला. दौंड पोलीस स्टेशन, गोपनीय विभागाचे पो.हवा. पांडुरंग थोरात यांनी शांतता कमिटी बैठकीचे आयोजन केले.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

16 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

18 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

20 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago