Categories: Previos News

Double Murder : खुटबाव मधील ‛त्या’ दुहेरी हत्याकांडाचे कारण अज्ञातच, मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात



दौंड सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

 

दौंड तालुक्यातील खुटबाव येथे पतीने स्वतःची पत्नी आणि अन्य एका पुरुषावर कोयता आणि धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. या दुहेरी हत्याकांडामुळे खुटबावसह संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

पोलिसांनी लागलीच हत्याकांडातील संशयित आरोपीला जेरबंद केले मात्र अजूनही खुनाचे मुख्य कारण गुलदस्त्यातच आहे. याबाबत खुटबावचे पोलीस पाटील पोपट बाबुराव कांबळे (वय ५८) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मंगेश अरूण जाधव (रा.विठ्ठलवाडी  डॅम जवळ ता. शिरूर जि. पुणे) याने दि. ३१ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या पुर्वी खुटबाव गावच्या हद्दीत असणाऱ्या मटकळा वस्ती येथे कोयता व लाकडी काठीने त्याची पत्नी मनिषा ऊर्फ हनिबाई ऊर्फ अशीबाई मंगेश जाधव (रा. विठठलवाडी ता. शिरूर) व दिपक वाघमारे (रा. भोर जि पुणे) यांना अज्ञात कारणावरून वार करून ठार मारले.

याबाबतची हकीकत जाणून घेण्यासाठी DYSP श्रीमती एैश्वर्या शर्मा IPS आणि यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देत सर्व बाबीतपासून पाहत माहिती घेतली आहे. हा गुन्हा पो.स.ई. वाघमोडे यांनी दाखल करून घेतला असून अधिक तपास खुद्द पोनी भाऊसाहेब पाटील करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

7 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

23 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago