Categories: राजकीय

सहानुभूतीसाठी ‘फ्लेक्स’ फाडाफाडी नको, फ्लेक्स ‘फाटत’ असतील असेल तर करा ‘हे’ काम, होऊन जाईल ‘दूध का दूध, पाणी का पाणी’

राजकीय

दौंड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधून सुरु आहे. विविध गावांमध्ये निवडणूक प्रचाराचे फ्लेक्स लावले जात असून हे फ्लेक्स कुणीतरी अज्ञात व्यक्ती फाडत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र जर हे फ्लेक्स कुणी फाडत असेल तर त्या फ्लेक्स चे फोटो सोशल मिडीयावर टाकून सहानुभूती मिळविण्यापेक्षा थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल का केले जात नाहीत असा सवाल सर्वसामान्य लोकांमधून उपस्थित केला जात आहे.

विकासकामांची पोलखोल

सध्या दौंड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तप्त झाले आहे. प्रत्येक निवडणुकांमध्ये काहीजण वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून सहानुभूती मिळविण्याचे काम करतात. काहीजण मग स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल मात्र सहानुभूती महत्वाची असल्याचे हेरून काही चुकीची कृत्ये करतात आणि त्याचा गवगवा सोशल मिडीयावर करत राहतात आणि तक्रार देण्याचे टाळतात. तक्रार दिली तर आपण गोत्यात यायला नको हा या मागचा उद्देश असतो असे जुन्या जाणकार राजकीय व्यक्तींच्या बोलण्यातून समजते.

जर खरंच अन्याय होत असेल, फ्लेक्स, फोटो, पॉम्पलेट फाडले जात असतील तर त्याची तक्रार, फिर्याद अगोदर पोलीस ठाण्यात द्यावी जेणेकरून पोलीस यंत्रणा समाजकंटकांना शोधून त्यांना धडा शिकवतील. मात्र अनेकजण तक्रार, फिर्याद देण्याच्या गोष्टी करण्यात रस दाखवत नाहीत किंवा मुद्दाम तक्रार देत नाहीत आणि सोशल मिडियावर मात्र याची जाहिरात करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतात असा आरोप सर्वसामान्य नागरिक करताना दिसतात.

Team Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

17 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

18 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

19 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

1 दिवस ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago