Crime News

दौंड : एम डी मेडिसिन ची पिजी करण्यासाठी ॲडमिशन करुन देतो म्हणत दौंड शहरातील एका डॉक्टरची सुमारे 46 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संबंधित डॉक्टरने पुण्यातील एका डॉक्टरसह त्याच्या भावावर दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संजीव केशव करंडे (वय 47वर्षे व्यवसाय डॉक्टर रा. समतानगर दौंड ता. दौंड जि. पुणे) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरांचे नाव असून त्यांची आरोपी डॉ.अक्षय देशमुख व त्यांचा भाउ सागर देखमुख (रा.कात्रज जि पुणे) यांनी फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादित म्हटले आहे. ही घटना दिनांक 21.12.2024 पासून ते दिनांक 02/11/2025 रोजी पर्यत घडली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी डॉ. अक्षय देशमुख व त्यांचा भाउ सागर देशमुख या दोघांनी मिळून डॉ. संजीव केशव कारंडे यांना एम.डी. मेडीसीन (पी.जी) करण्यासाठी ॲडमिशन करून देतो असे सांगुन त्यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून वेळोवेळी ॲडमिशनसाठी सुमारे 46 लाख रूपये घेवुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी डॉ. अक्षय देशमुख व त्यांचा भाउ सागर देखमुख यांच्या विरूध्द तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पो.स.ई उगले हे करीत आहेत.







