Dnd : संत गाडगे बाबांना दौंडमध्ये आदरांजली अर्पण



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

ज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता या विषयी जागरुकता निर्माण करणारे संत गाडगे बाबा महाराज यांच्या 64 व्या स्मृति दिनानिमित्त श्री संत गाडगेबाबा परीट समिती( दौंड शहर व तालुका) च्या वतीने येथील बाबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात  आली.



समाजासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी अभिवादन केले. करोना च्या पार्श्वभूमीवर समितीने गर्दी करण्याचे टाळून शासनाच्या नियमांचे पालन करीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पाडला.

‛अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं, रंजल्या गांजल्याची सेवा करावी, मुक्या प्राण्यावर दया करावी, बापहो देव यांच्यात राहतो, देव देवळात राहात नाही, देव आपल्या मनात राहतो अशा विचारांचा प्रसार करणाऱ्या संत गाडगे बाबांना ‛सहकारनामा’च्या वतीनेही विनम्र अभिवादन.