DJ मालकाला उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांचा दणका, धडक कारवाईत DJ मालकावर गुन्हा दाखल



दौंड: सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी) 

शहराजवळील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील अशोक नगर येथे विनापरवाना सुरू असलेल्या कार्यक्रमावर दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी धडक कारवाई करीत कार्यक्रमाचे आयोजक व व डीजे सिस्टीमच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. डीजे साऊंड सिस्टीमचा वापर करणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर व व डीजे मालकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देत ऐश्वर्या शर्मा यांनी अशा याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगितले.

दिनांक 25 जून रोजी रात्री 12 वाजताच्या दरम्यान पोलीस  उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा या रात्रीची गस्त घालत असताना दौंड शहरालगतच्या लिंगाळी हद्दीतील अशोक नगर येथे एका कार्यक्रमादरम्यान साऊंड सिस्टिमचा वापर करीत गाणी वाजविली जात होती. हे त्यांच्या निदर्शनास आल्याने शर्मा यांनी त्याठिकाणी जात कार्यक्रमातील साऊंड सिस्टिम बंद केली व घटने संदर्भाची माहिती दौंड पोलीस स्टेशनला देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. ऐश्वर्या शर्मा यांचे आदेशाने दौंड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे , पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते, सुरज गुंजाळ, रवी काळे, चालक पोलीस हवालदार महेश भोसले या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन कार्यक्रमाचे आयोजक, डीजे मालक व इतर त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी डीजे साऊंड सिस्टिम साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोणतीही परवानगी न घेता मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन झाल्याने पोलीस कॉन्स्टेबल शुभम भोसले यांच्या फिर्यादीवरून संबंधितांवर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा तसेच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पांडुरंग थोरात  पुढील तपास करीत आहेत.