Categories: Previos News

DJ’ नसता तर वाचले असते ‛राहू’ येथील युवकाचे प्राण! नदीत वाहून गेलेल्या ‛दुर्गेश पंडित’ या युवकासोबत त्या दिवशी घडले असे काही..



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील ‛राहू’ या गावात राहणारा दुर्गेश पंडित हा 17 वर्षीय युवक नदीत गणेश मूर्ती विसर्जन करताना वाहून गेला आणि काल त्याचा मृतदेह देलवडी जवळ सापडला. आता दुर्गेशच्या मृत्यूबाबत नवनवीन घटना समोर येऊ लागल्या असून यामुळे खरंच जर असे घडले नसते तर दुर्गेश  पंडित आज आपल्या परिवारासोबत हसत खेळताना दिसला असता.

ज्या दिवशी दुर्गेश पंडित या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला त्या दिवशी म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी दुर्गेश आणि त्याच्या मित्रांसोबत काही घटना घडल्या होत्या. ज्यावेळी दुर्गेश पंडित हा आपल्या मित्रांसोबत गणेश विसर्जनासाठी नदीवर गेला त्यावेळी त्यांनी तेथे उपस्थित नागरिकांसमोर आणलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन ही केले होते. मात्र त्यावेळी त्यांनी गणेश विसर्जनासाठी आणलेली त्यातील मोठी मूर्ती हि विसर्जन न करता ती तशीच ठेवू असा निर्णय घेतला आणि ती मूर्ती घेऊन ते पुन्हा गावात आले. 

त्यावेळी दुर्गेश पंडिय आणि त्याच्या मित्रांनी गणेश मूर्ती गावातील एका मंदिरात ठेवण्याचा निर्णय घेत ती मूर्ती मंदिराच्या दरवाजातून आत घेऊन जात असताना त्या मूर्तीचा एक हात दुभंगला त्यामुळे दुभंगलेली मूर्ती आता ठेवण्यापेक्षा तिचे विसर्जन करू असे दुर्गेश आणि त्याच्या मित्रांनी ठरवले.

त्यावेळी राहूचे पोलीस पाटील सुरेश सोनवणे हेही तेथे उपस्थित होते त्यांनी मुलांना एकटे जाऊ नका आम्ही तुमच्यासोबत येतो असे म्हणत पोलीस पाटील आणि एक पोलीस कर्मचारी त्या मुलांसोबत जाऊ लागले मात्र त्याचवेळी त्यांना गावातुन फोन आला आणि कुणीतरी DJ लावला आहे त्यामुळे गावात शांतता भंग होऊ शकते असा संदेश फोनवरून दिला. त्यामुळे पोलीस पाटील आणि ते पोलीस कर्मचारी  तातडीने DJ लावलेल्या ठिकाणी निघून गेले. 

तो पर्यंत या मुलांनी ती गणेश मूर्ती घेऊन ते नदीच्या किनारी गेले अण… पुढील तो सर्व अनर्थ घडला. त्यामुळे खरंच जर तो DJ लावला गेला नसता तर निश्चित पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी हे त्या मुलांसोबत पुन्हा नदीवर गेले असते अण दुर्गेशला मृत्यूला सामोरे जाऊ लागले नसते! पण आता वेळ निघून गेली आहे आणि अनेकजण नशिबाला दोष देत आहेत पण खरंच ती DJ नसता तर तर कदाचित या मुलाचे प्राण वाचले असते अशीही चर्चा गावात सुरू आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

21 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago