– सहकारनामा
दौंड : संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौंड मधील भीमसैनिकांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी केली.
गेल्या वर्षी चे असलेले कोरोना चे सावट या वर्षीच्या आंबेडकर जयंती वर सुद्धा असल्याने भीमसैनिकांनी आपल्या भावनांना आवर घालीत, सर्वांच्याच आरोग्याचा विचार करून जयंतीला गर्दी करणे, नाचगाणे करणे टाळीत जयंती साजरी करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला.
दि.13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आला. यावेळी दौंडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, स्मारक समितीचे पदाधिकारी रवींद्र कांबळे, प्रकाश भालेराव, विकास कदम आदी उपस्थित होते. रात्री ठीक 12 वा. राजगृह बुद्ध विहाराचे राजेश मंथने व विधी कारांनी पंचशील व धम्म वंदनेचे पठण केले. यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.
आमदार राहुल कुल, नगराध्यक्ष शितल कटारिया, माजी आमदार रमेश थोरात तसेच शहरातील सर्वच पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.