Categories: Previos News

सामाजिक बांधिलकीतून 200 महिलांना साड्यांचे वाटप

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज मासाळ व त्यांच्या सहकाऱ्यानीं गोरगरीब महिलांसाठी एक चांगला उपक्रम हाती घेतला असून मकरसंक्रांतीचे औचित्य साधत मोल मजुरीसाठी, ऊसतोडण्यासाठी बाहेगावाहून आलेल्या महिलांची मकरसंक्रांत गोड होऊन त्यांनाही हा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी २०० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी धनराज मासाळ या सामाजिक कार्यकर्त्याने व्हॉट्सअप ग्रुप मार्फत अनेकांना मदतीचे आव्हान केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून श्री स्वामी समर्थ मठ (बावीस फाटा ) केडगाव हेल्पसेंटर (व्हाट्सअप ग्रुप) व जिवलगा महिला बचत गटाने त्यांना भरघोस अशी मदत केली तसेच त्यांनी केडगाव , खुटबाव, बोरीपारधी, देशमुखमळा, शेळके वस्ती, 22 फाटा, हंडाळवाडी येथील मजुरांच्या राहुट्यावर जाऊन साड्यांचे वाटप केले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढील वर्षी अजून जास्त महिलांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे असे यावेळी धनराज मासाळ यांनी सांगितले त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या साडीवाटप कार्यक्रमासाठी संजय गरदडे, राहुल महाराज राऊत, धनराज मासाळ, पाराजी हंडाळ, निखिल थोरात, नंदिनी गायकवाड, किशोर सातपुते, कानिफनाथ मांडगे, राहुल भणभने, शरद शेळके, जिवलगा महिला बचत गटाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

11 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago