अख्तर काझी
दौंड : रमजान ईद च्या निमित्ताने शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने येथील उस्मान अली शाब्दि उर्दू हायस्कूलच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना धान्य व कपडे वाटप करण्यात आले.
आपणही या समाजाचे काही देणे लागतो व आपल्या प्रमाणेच प्रत्येकाच्या घरी सण साजरा व्हावा या भावनेने संस्थेचे अध्यक्ष हाजी मकबूल अहमद शाब्दि गेली 15 ते 20 वर्ष हा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका झरीना काझी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.
शहरातील हिंदू -मुस्लिम भाईचारा अबाधित रहावा या उद्देशाने दौंड शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने रमजान ईद निमित्ताने दौंड मधील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन ईद मिलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथील महात्मा गांधी चौकामध्ये रमजान ईद च्या दुसऱ्या दिवशी ईद मिलन कार्यक्रम पार पडणार असल्याचे समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले.