दौंड : समाजातील सर्वच घटकांनी दिवाळी साजरी केली पाहिजे ही सामाजिक जाणीव जोपासत येथील वाहेगुरू सेवा संस्थेने अविश्री बाल सदनातील विद्यार्थ्यांबरोबर दिवाळी साजरी करीत सर्वांसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.
विद्यार्थ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी वाहेगुरू च्या वतीने त्यांना मिठाई, फटाके व नवीन कपडे भेट देण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अवीश्री बाल सदनाचे प्रमुख अनिल कटारिया यांनी उपक्रमाबाबत वाहेगुरू चे आभार मानले. वाहेगुरू संस्थेचे राम दावरा यांनी उपक्रमाचे आयोजन केले. विजय भागवानी, आकाश गिदवाणी, सुशील सुखेजा, पवन छाब्रा, सुनील सुखेजा व सहकारी मित्रांचे सहकार्य लाभले.
वाहेगुरू सेवा संस्थेच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. कोरोना संसर्गाचा शहरात मोठा प्रादुर्भाव झाला असताना संस्थेच्या वतीने पीडित रुग्णांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. या सेंटरमधील रुग्णांना मोफत औषधोपचार व भोजनाची सोय संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला या कोविड सेंटरची मोठी मदत मिळाली होती.