नानविज येथील वयोवृद्ध बेपत्ता, कुणाला आढळल्यास दौंड पोलीसांना संपर्क साधा


दौंड :

नानविज (ता. दौंड) येथे राहणारे जनार्दन भिकोबा पाटोळे (वय 82 वर्ष) दि. 11 ऑक्टोबर पासून घरातून कोठेतरी निघून गेले आहेत. रंग गोरा, डोळ्यावर चष्मा, उजवा डोळा बारीक, नाक सरळ, चेहरा गोल, चेहऱ्यावर लहान पांढरी दाढी, उंची 5 फूट 5 इंच. हातामध्ये काठी, अंगामध्ये पांढरी कोपरी व त्यावर तीन गुंडयाचा शर्ट, डोक्यावर टोपी असा आजोबांचा पेहराव आहे.

त्यांच्या पायात काळ्या रंगाची चप्पल असून ते मराठी भाषा बोलतात. नवनाथ सदाशिव शितोळे (रा. नानविज, दौंड) यांनी सदर व्यक्ती बेपत्ता झाल्याची खबर पोलिसांना दिली आहे. सदर वर्णनाची ही व्यक्ती कोठे दिसल्यास दौंड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क: महेंद्र गायकवाड (सहा. पो. निरीक्षक)-7218624871
दौंड पो. स्टे.-02117-262333