दौंड : ‘धनलक्ष्मी’ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जयप्रकाश जियालाल अग्रवाल तर उपाध्यक्षपदी विठ्ठल रंगनाथ शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे सचिव नारायण खळदकर यांनी दिली आहे.
01 जानेवारी 1998 रोजी या पतसंस्थेची स्थापना करण्यात आली असून या पतसंस्थेची सभासद संख्या 1869 इतकी आहे.
सध्या पथसंस्थेकडे 5.73 कोटीच्या ठेवी असून यामध्ये स्वनिधी 3.72 कोटि आणि खेळते भांडवल 9.93 कोटि इतके असून प्रत्येकवर्षी लाभांश वाटप करण्यात येतो हे विशेष.
संस्थेचा 31 मार्च 2022 अखेर नफा 20.30 लाख इतका असून संस्थेने 7.66 कोटि कर्ज दिले आहे आणि त्यांचा व्याजदर हा तारण कर्ज 12% तर विना तारण कर्ज 13% इतका आहे.
संस्थेची नविन कार्यकारिणी
अध्यक्ष – अग्रवाल जयप्रकाश जियालाल, उपाध्यक्ष – शेळके विठ्ठल रंगनाथ, सचिव – नारायण खळदकर,
सदस्य – पवार काकासाहेब ज्ञानदेव, देशमुख भानुदास सुंदरबापु, अग्रवाल विनय जयप्रकाश, सोडनवर दत्तात्रय भाऊसाहेब, फासगे जयसिंग नारायण,
नवलकर रागिणी यहोशवा, फनसे नंदा राजेंद्र, नेवसे भानुदास सावता, धायगुडे सुनिल रामचंद्र