धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व
सोई-सुविधा मिळणार!

अब्बास शेख

मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सोई-सुविधा दिल्या जातील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. असे विधान मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी मुंबई वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित धनगर समाजाच्या मेळावा आणि सन्मान सोहळ्यात व्यक्त केले.

धनगर समाजातर्फे आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आवर्जून उपस्थित होते. या वेळी त्यांचा पारंपरिक पध्दतीने गजीढोल वाजवून सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांनीही तो सन्मान मोठ्या आनंदाने स्वीकारला. कार्यक्रमाला आमदार दादाजी भुसे, अब्दुल सत्तार, विजय शिवतारे आदी जेष्ठ नेते उपस्थित होते.

काय होती धनगर समाजाची मागणी…
धनगर आणि धनगड अशा ह्या दोन वेगळ्या जाती असल्याचा दावा मागील सरकारच्या काळात सरकारने केला होता आणि तसं प्रतिज्ञापत्र त्यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिलं होतं. तर धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही असा मुद्दा त्यावेळी धनगर समाजाच्या वतीने मांडण्यात आला होता.