पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (vaishali nagawade) यांनी सामाजिक न्याय मंत्री (Minister of Social Justice) धनंजय मुंडे (dhananjay munde) यांना पत्रव्यवहार करून विधवा महिलांना ग्रामपंचायतींकडून येणाऱ्या अडचणीबाबत त्यांचे लक्ष वेधले आहे. या महिलांसाठी त्वरित निर्देश देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
विधवा महिलांना संजय गांधी निराधार, श्रावण बाळ या योजनांच्या सुविधांकरीता त्यांच्या पतीच्या मृत्युच्या दाखल्याची आवश्यकता असते परंतु सदरील दाखला मिळणेकरीता ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी व घरपट्टीचे निकष लावले जात असल्याने अनेक विधवा महिला या योजनेसाठी पात्र असतानाही त्यांना या योजनेपासून मुकावे लागत आहे. त्यामुळे विधवा महिलांना सदरील किचकट निकष न लावता फक्त शासकीय फी मध्ये प्रमाणपत्र/दाखले ग्रामपंचयातीकडून
मिळावेत अशी मागणी वैशाली नागवडे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. याबाबत संबंधित खात्याला धोरण आखून याबाबत निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा >>> गुळात एक्स्पायर झालेले चॉकलेट, अन्न व औषध प्रशासनाची गुऱ्हाळ चालकांवर मोठी कारवाई !https://sahkarnama.in/expired-chocolate-mix-jaggery/
तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमधील समाविष्ट नागरिकांना स्मार्टकार्ड मिळण्याबाबत त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
त्यांनी याबाबत माहिती देताना, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो. त्यासाठी महाराष्ट्रातील जवळपास १००० रुग्णालयांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला असून प्रत्येक रुग्णांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी स्मार्टकार्ड
मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आणि रुग्णांना कसा त्रास होतो हे सांगताना त्यांनी ज्या रुग्णालयांचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये
आहे त्यांच्याकडून रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जसे की या योजनेत समावेश असलेल्या रुग्णालयांच्या दर्शनी भागामध्ये योजनेची माहिती दिलेली नसते, आरोग्य सेवक जागेवर उपलब्ध नसतात त्यामुळे अनेक रुग्णांना केवळ रुग्णालयाच्या नाकर्तेपणामुळे या योजनेपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे याबाबत योग्य ते निर्देश देण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.