Dhananjay Munde explain on rape case : धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप, बलात्कार नव्हे सहमतीने संबंध असल्याचा धनंजय मुंडे यांचा मोठा खुलासा



मुंबई : सहकारनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या बलात्कारांच्या आरोपांनी बेजार झाल्याचे दिसत आहेत. Dhananjay Munde explain on rape case नुकताच राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर  बलात्काराचा आरोप होऊन ते प्रकरण धगधगत असतानाच आता थेट राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली केल्याने एकच खळबळ माजली आहे. 

या तरुणीने 10 जानेवारी रोजी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

या तरुणीने केलेल्या आरोपांमध्ये तिच्यावर  2006 पासून हे अत्याचार होत असल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या तक्रारीनुसार फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवून देण्याच्या आमिषाने तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले गेल्याचा आरोप तिने केला आहे. हे सर्व प्रकरण गाजू लागल्याने धनंजय मुंडे यांनी स्वतः या संपूर्ण प्रकाराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

(Dhananjay Munde explanation on rape case)

 धनंजय मुंडे म्हणतात..

कालपासून सोशल मीडिया आणि विविध माध्यमातून माझ्याबाबत कागतपत्रे काही प्रसिद्ध  होत असून माझ्यावर बलात्काराचे आरोप केले जात आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने (आरोप करणाऱ्या महिलेची  पोस्ट टाकणारी तरुणी ही सख्खी लहान बहीण आहे) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहेत. हे प्रकरण काय आहे हे खालील बाबीवरून आपल्या लक्षात येईल..

एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत.

मात्र 2019 पासून तक्रारदार महिलेची बहिणीने मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ देखील सहभागी होता.

या बाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी मी 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये संबंधित महिलेने समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने, मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत आणि खाजगी साहित्य प्रकाशित केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात त्यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली आहे.

सदर याचिकेत उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात श्रीमती यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही. माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती आहे.

तथापी कालपासून तक्रारदार यांच्या भगिनी आहेत यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक आणि माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रतिदेखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, या श्रीमती त्यांची बहीण आणि त्यांचा भाऊ यांचा मला ब्लॅकमेल करणे आणि माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे.

माझ्याकडे श्रीमती यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे sms रुपी पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो.

मला खात्री आहे की या सर्व प्रकरणाची संबंधीतांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल. तथापी माझी आपल्याला विनंती आहे की सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. कारण सदर प्रकरणी श्रीमती यांच्या विरोधात दावा प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणी 2 अज्ञान बालकांचा सुद्धा समावेश आहे.

हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे आणि बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे. त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.

अश्या प्रकारे धनंजय मुंडे यांनी आपले मत मांडले आहे, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होणारे आरोप हे आता पक्षाच्या दृष्टीने मात्र डोकेदुखी बनले आहे.