Categories: Previos News

वरवंड येथे पोलीस चौकीची मागणी, जागाही उपलब्ध करून देण्याची तयारी

वरवंड (दौंड) : दौंड तालुक्यातील वरवंड येथे पोलीस चौकीची मागणी करण्यात आली असून याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दौंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा योगिनी विजय दिवेकर यांच्यावतीने विनंती अर्ज करण्यात आला आहे.

वरवंड हे विस्तार होत असलेले मोठे गाव असून या ठिकाणी गोपीनाथ विद्यालय, एकनाथ सिताराम दिवेकर सिनिअर कॉलेज, इंग्लिश मिडीयम, फार्मसी कॉलेज येथे विविध प्रकारच्या शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 7 हजारांच्या घरात आहे. शिक्षणासाठी बाहेरून येथे येणारे विद्यार्थी आणि स्थानिक विद्यार्थी यांमध्ये वादविवाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीसारख्या घटनेमध्ये होत असते.

हाणामारी सारख्या प्रकारांमुळे गावाचे नाव बदनाम होत असून शिक्षणासाठी येथे येणाऱ्या विद्यार्थिनी, महिला, विध्यार्थ्यांमधेही एक प्रकारची भीती जाणवत असते त्यामुळे येथे पोलीस चौकी होणे गरजेचे असून यासाठी लागणाऱ्या जागेची व्यवस्था आम्ही करु अश्या आशयाची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

17 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago