‛प्रभाकर साईल’ याने ‛समीर वानखेडे’ यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उद्या दिल्ली NCB ची टीम मुंबईत

मुंबई : राज्यात सध्या विविध प्रश्न मागे पडून ड्रग्ज (Drugs) कनेक्शन, आर्यन खान (aryan khan) याचा जामिन, नवाब मलिक (nawab malik) यांचे आरोप आणि (NCB) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांची संशयास्पद कारवाई यावरच सध्या सर्वत्र भाष्य होताना दिसत आहे. ज्या दिवशी आर्यन खान याच्यावर ड्रग्ज प्रकरणी कारवाई झाली त्या दिवसापासून हे सर्व बनावट आणि घडवून आणले गेले असल्याचे आरोप मंत्री नवाब मलिक यांनी सुरू केले. नवाब मलिक जसजसे आरोप करत गेले तसतसे ते पुरावेही सादर करत असल्याने या सर्व प्रकरणातील गांभीर्य वाढत चालले आहे. या प्रकरणातील प्रमुख पंच असणारा प्रभाकर साईल (prabhakar sail) याने मीडिया समोर येऊन हे सर्व पैशांसाठी केले गेल्याचा आणि यातील इतर साक्षिदार किरण गोसावी व समीर वानखेडे यांनी पैसे मिळविण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचा दावा करत याबाबत पुरावे देऊन एकच खळबळ माजवून दिली. या सर्व प्रकरणावर ncb ने त्यांचे अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्लीला तातडीने बोलवून चार तास चौकशी केली तसेच उद्या ते मुंबईला येऊन प्रभाकर साईल याचीही चौकशी करणार आहेत. चौकशीसाठी (ncb) एनसीबीचे पाच सदस्यीय पथक उद्या दिल्लीहून मुंबईला येणार आहे. या टीममध्ये DDG NCB ज्ञानेश्वर सिंह यांच्यासह अन्य चार एनसीबी (ncb) अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.