| सहकारनामा |
नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस (Decline in corona patients in India) हाहाकार माजवत असताना एक सुखद बातमी (good news for india) समोर आली आहे.
देशात कोरोनाबाधित होण्याचा आकडा हा कमी झाला असून ANI ने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या आठवड्या भरात दररोज 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत होते आता हा आकडा काल दिवसभरात 2 लाख 81 हजार 386 इतक्यावर आला होता. जवळपास सव्वालाख रुग्ण कमी झाल्याने आता कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्याचे होत असल्याचे समोर आले आहे.
काल दिवसभरात 2 लाख 81 हजार 386 इतके रुग्ण नव्याने कोरोना बाधित झाले असून सुमारे 4 हजार 106 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे तर सुखद बातमी म्हणजे काल दिवसात देशात 3 लाख 78 हजार 741 रुग्ण हे कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.
देशात लसीकरणाचा वेग पाहता काल एका दिवसात 6 लाख 91 हजार 211 जणांना लस देण्यात आली आहे.