Categories: देश

संसदेत प्रस्ताव पास करून चंद्राला हिंदुराष्ट्र घोषित करा आणि या ठिकाणाला राजधानी बनवा : स्वामी चक्रपानी

चांद्रयान -3 मोहीम फत्ते झाली आणि देशात आनंद आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले चांद्रयान-3 यशस्वीरित्या उतरवून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. आता याच चांद्रयान मोहिमेला घेऊन अखिल भारत हिंदू महासभा / संत महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी एक मोठी मागणी केली आहे.

स्वामी चक्रपाणी यांनी चंद्राला सनातन हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावे अशी मागणी केली असून ज्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरले त्या ठिकाणाला म्हणजेच शिवशक्ती पॉईंटला राजधानी म्हणून विकसित करावे असे विधान केले आहे. हे सर्व करण्यासाठी संसदेमध्ये प्रस्ताव पास करण्यात यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रावर दहशतवादी विचारधारा पोहचू नये म्हणून चंद्रावर इतर धर्माचे किंवा इतर देशांचे लोक जाऊन तेथे गज्वा ए हिंद, जिहाद करू नये, तेथे जाऊन कोणी धार्मिक विचारधारा पसरवू नये आणि तेथे आतंकवादी कारवाया जोपासल्या जाऊ नये म्हणून त्याला हिंदुराष्ट्र घोषित करावे अशी मागणी स्वामींनी केली आहे.

हिंदू धर्मामध्ये चंद्राला अनन्य साधारण असे महत्व आहे. त्यामुळे चंद्राची शुद्धता अबाधित राहावी यासाठी चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्ह्टले आहे. यावेळी चांद्रयान सफल होऊन तेथे शिवशक्ती पॉईंट दिल्याबद्दल स्वामींनी पंतप्रधान मोदींचे विशेष आभार मानले आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

20 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

22 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

23 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

1 दिवस ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago