दौंड : दौंड तालुक्यातील ज्येष्ठ नेते, पुणे जिल्हा दूध संघाचे मा.संचालक तथा वरवंडचे माजी सरपंच रामदासनाना दिवेकर यांचे निधन झाले. पुणे सोलापूर महामार्गावर त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर ते अनेक महिन्यांपासून बिछाण्यावर खिळून होते. कुशल संघटक आणि एक मुरब्बी राजकारणी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात त्यांची ख्याती होती.
बारामती विभागाच्या खासदार यांनी रामदास नानांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, ही बातमी अतिशय दुःखद असून, त्यांच्या निधनामुळे दिवेकर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, अश्या शब्दांत त्यांनी दिवेकर कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
दौंडचे आमदार राहुल कूल यांनीही, भीमा सहकारी साखर कारखाना पाटस चे माज़ी संचालक,पुणे जिल्हा दुध संघाचे माजी संचालक, वरवंड गावचे माजी सरपंच , ज्येष्ठ नेते श्री रामदास नाना दिवेकर यांच्या पवित्र स्मृतींस भावपूर्ण श्रद्धांजली. अश्या शब्दांमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मा.आमदार रमेश थोरात यांनीही नानांच्या जाण्याने आपण एका विश्वासू सहकाऱ्याला मुकलो असल्याची भावना व्यक्त करून दिवेकर कुटुंबियांच्या प्रत्येक सुख दुःखात आपण कायम पाठीशी उभे असल्याचे म्हणत नानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनीही नानांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे म्हणत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.