निधन वार्ता | कै.बाळकृष्ण शेळके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

दौंड : केडगाव (ता.दौंड) येथील कै.बाळकृष्ण पंढरीनाथ शेळके (पाटील) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले. केडगाव गावचे माजी पोलीस पाटील पद त्यांनी सांभाळले होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख होती.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे, दोन भाऊ एक बहीण असा मोठा परिवार आहे. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन शेळके यांचे ते चुलते होते. दशक्रिया विधीचा कार्यक्रम सोमवार दिनांक २१/०८/२०२३ रोजी सकाळी ८:३० वाजता पद्मावती तळे, केडगाव येथे होणार आहे.