मळद च्या तलावात मृत माश्यांचा खच, MIDC च्या रसायन मिश्रित पाण्याने मासे मेल्याचा आरोप

नितीन काळे

खडकी : दौंड तालुक्यातील मळद येथे असणाऱ्या तलावातील हजारो मासे मृत झाले आहेत. दूषित झालेल्या पाण्यामुळे हे मासे मृत झाल्याचे नागरिक सांगत असून या हजारो मृत माश्यांचा खच येथे पहायला मिळत आहे.

कुरकुंभ MIDC तील काही कंपन्यांच्या रसायन मिश्रित पाण्यामुळे मासे मेल्याचा आरोप..
काही दिवसांपासून या परिसरात पाऊस पडत असून या पावसाच्या पाण्यात कुरकुंभ (ता.दौंड) औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या हजारो लिटर रसायनमिश्रीत सांडपाणी सोडत आहेत. हे पाणी ओढ्याच्या माध्यमातून चार किलोमीटर अंतरावरील मळद हद्दीतील तलावात साठून राहत असल्याने परिसरातील पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहेत. त्याचा परिणाम येथील मासे मृत होताना दिसत आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या रसायन मिश्रित सांडपाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता परिसरातील बोअरवेल व उघड्यावर सोडत असल्याचा आरोप होत आहे.

अनेक कंपन्या पावसाच्या पाण्यात रसायन मिश्रित सांडपाणी सोडत असल्याचा प्रकार घडत आहे. मात्र प्रदुषण महामंडळ, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. हे प्रदूषित सांडपाणी ओढ्याच्या माध्यमातून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मळद तलावात जात आहे. त्यामुळे तलावातील पाण्यावर काळ्या रंगाचा तवंग दिसून येत असून उग्रवास येत असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहे. या रसायन मिश्रित पाण्यामुळे तलावातील मासे मरण पावत असून यामुळे जलचरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

21 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago