Daund : दौंड शुगर कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दौंड शुगर कारखान्याचा 12व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे व त्यांच्या पत्नी डॉ.संगीता जगदाळे यांच्या हस्ते संपन्न झाला. 

यावेळी दौंड शुगरचे चेअरमन जगदीश कदम, बारामती टेक्स्टाईलच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच कारखान्याचे अधिकारी, कामगार वर्ग उपस्थित होते. 

यंदाच्या हंगामात 12 लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, FRP प्रमाणे शेतकऱ्यांना दर देण्यात येणार असल्याचे वीर धवल जगदाळे यांनी सांगितले.