Categories: Previos News

Daund : पार्थ दादा आम्ही तुमच्या सोबत, तुषार थोरतांच्या ट्विटने दौंड राष्ट्रवादीत खळबळ



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मराठा आरक्षण संदर्भात मराठा नेत्यांनी एकत्र येऊन लढ़ा दिला पाहिजे व मराठा आरक्षण साठी सुप्रीम कोर्ट मध्ये जाणार असे ट्वीट केले होते.

राज्यातील अनेक तरुणांनी त्यांच्या या निर्णायाचे स्वागत केले असून दौंड तालुक्यात सुद्धा जिल्हाबँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात यांनी पार्थ पवार यांच्या भूमिकेला ट्विट करून पाठींबा दिला आहे.

आज त्यांनी ट्विट केल्यानंतर त्या संदर्भात माहिती देताना असे म्हटले आहे की मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पार्थ पवारांनी जे पाऊल उचलले आहे हे नक्कीच समाजाला ताकद देणारे आहे, आम्हाला आपला अभिमान आहे, त्यामुळे आम्ही पार्थ पवार यांच्या सोबत आहोत. असे ट्वीट तुषार थोरात यांनी करून पार्थ पवार यांना पाठिबा दिला आहे. 

सध्या पार्थ पवार आणि त्यांचे आजोबा शरद पवार यांच्यात ताळमेळ बसताना दिसत नाही. मागे पार्थ पवारांनी सुशांत सिंह प्रकरणात आपली भूमिका मांडल्यानंतर शरद पवारांनी मिडीया समोर आपण पार्थ पवारांच्या म्हणण्याला काडीचीही किंमत देत नसल्याचे सांगितले होते आणि यामुळे गृह कलह होतो का काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र पार्थ पवारांच्या म्हणण्याला राष्ट्रवादीतूनच पाठिंबा मिळत असल्याने राष्ट्रवादीतच जेष्ठ आणि युवा असे दोन गट पडतात की काय अशी शंका उपस्थित केली होत असून याबाबत पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

8 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago