Daund – कुरकुंभ येथे कामगार राज्य विमा महामंडळाचे कार्यालय सुरू, कामगारांना मिळणार लाभ



कुरकुंभ : सहकारनामा(आलिम सय्यद)

कुरकुंभ येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यालयाचे उदघाटन कुरकुंभ येथे राज्य विमा महामंडळ ( ESIC ) चे पुणे संचालक  हेमंत कुमार पांडे  यांच्या हस्ते करण्यात आले. 

दौंड तालुक्यात औद्योगिक वसाहत असल्याने येथे हजारो कामगार काम करत आहेत. या कामगारांचा काम करताना अपघात झाल्यास त्याचा खर्च ESIC च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जर कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला कार्यालया मार्फत पेन्शन मिळत असल्याचं हेमंत कुमार पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

या कार्यक्रमास सुशील कुमार, राजेश सिंग, संदीप कुमार, कुरकुंभ शाखा व्यवस्थापक दिनेश वाघमारे, अरविंद कुमार, जितेंद्र मीना, तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील सिप्ला कंपनीचे शशी सिंग, कुंभा केमिकल्सचे शशिकांत पाटील, जे.पी.कंपनीचे  विनोद शितोळे, एस.पी.शितोळे, तसेच विविध कंपन्यांचे अधिकारी, कामगार वर्ग उपस्थित होते.