Daund : भाजप कडून कृषिविधायक स्थगिती आदेशाची होळी



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाइन

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चाच्या वतीने राज्य शासनाने दिलेल्या कृषिविधयकाच्या स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली.

यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव नाना काळे, भाजपा तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, शहर अध्यक्ष फिरोज खान किसान मोर्चा  पुणे सरचिटणीस माऊली शेळके  ,सुभाष डाबी, सुनील शर्मा तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य सरकारकडून केंद्र सरकारने काढलेल्या कृषिविधायकाला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगिती आदेशाच्या विरोधात भाजपने आज दौंडमध्ये या स्थगिती आदेशाची होळी केली.