Daund – महावितरणवर ‛भाजप’चा हल्लाबोल



दौंड : सहकारनामा

आज केडगांव ता.दौंड येथे महावितरण विरोधात भाजपच्या वतीने टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

या वेळी महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना शेती पंपाचे कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले असा आरोप भाजपने करत महावितरणचा निषेध केला. 

तसेच वीजबील भरल्याशिवाय विद्युत ट्राँन्सफार्मर देणार नाही अशी आडमुठी भूमिका महावितरण घेत असल्याने यातून महाविकास आघाडी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा जनते समोर आला असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या आंदोलनाला दौंड तालुका भारतिय जनता पार्टीचे अध्यक्ष माऊली ताकवणे, भा.ज.पा किसान मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणिस माऊली शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय काळभोर, ग्रामविकास आघाडी सह संघटक गणेश आखाडे, दशरथभाऊ गरदडे, किरण काळे, अँन्ड श्रीकांन्त गुंड, किरण देशमुख,आबासाहेब चोरमले, दिनेश गडधे, गणेश शेळके, संभाजी थोरात, तुषार दोरगे यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.