Categories: Previos News

Daund – दौंड नगरपालिकेकडून मध्यरात्री नंतर पिण्याचे पाणी सोडले जात असल्याने हंडा मोर्चा आंदोलनाचा इशारा



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड शहरातील कुंभार गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर परिसरात दौंड नगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून मध्यरात्रीनंतर(रात्री 12 ते 2 दरम्यान) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत असल्याने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

येत्या सात दिवसांमध्ये नगरपालिकेने या परिसरातील पाण्याची ची वेळ बदलली नाही तर नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या परिसरातील त्रस्त नागरिकांनी नगरपालिकेला निवेदनाद्वारे दिलेला आहे. या  दोन्ही परिसरात कष्टकरी,वीट भट्टी कामगार,कुंभार व्यवसायिक, नगरपालिका कर्मचारी तसेच हातावर पोट भरणारे असंख्य नागरिक राहत आहेत. गेल्या अनेक एक वर्षापासून या परिसरात नगरपालिकेकडून रात्री 12 ते 2 वा. दरम्यान केव्हाही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे,.

नागरिकांच्या झोपेच्या वेळेस पाणी  पुरवठा होत असल्याने नागरिकांना रात्र रात्र जागरण करावे  लागत आहे यामुळे त्यांच्या  दैनंदिन कामावर त्याचा मोठा परिणाम होत असून या सततच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या  परिसरातील पाणी  पुरवठा सकाळी 6 ते 8 वा. दरम्यान अथवा सायंकाळी 7 ते 9 वा. दरम्यान करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास सात दिवसा नंतर केव्हाही  कुंभार गल्ली व अण्णाभाऊ साठे परिसरातील त्रस्त नागरिकांच्या वतीने दौंड नगरपालिकेवर हंडा मोर्चा आंदोलन केले जाईल असा इशाराही  निवेदनातून देण्यात आला आहे. 

निलेश सावंत, गजानन निंबाळकर, उद्धव घोडके, मारुती औरंगे, उपेश तुपसौंदर्य, शिरीष झोजे, माऊली झोजे, गणेश अल्हाट, अमित मोरे, अक्षय पवार, गणेश कुंभार, शिरीष कुंभार, हिरण खुडे, संदीप सावंत, अनुप आगलावे आदी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

3 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago