Categories: Previos News

Daund : हाथरस घटनेप्रकरणी दौंडमध्ये राष्ट्रवादीचा कॅण्डल मार्च, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका निष्पाप मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात येऊन नंतर तिच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण देशात तीव्र आंदोलन होत असून या मान खाली झुकविणाऱ्या संतापजनक घटनेचा दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही तीव्र निषेध नोंदविला आहे. 

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिला  राष्ट्रवादी  काँग्रेसच्या वतीने योगी आदित्यनाथ यांच्यासाठी निवेदन देण्यात आले ते दौंड पोलिसांनी स्वीकारले.

योगी आदित्यनाथजी आपण ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहात त्या उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार होतो आणि तिची निर्घृण हत्या करण्यात येते हे नक्कीच संतापजनक आहे. आपल्या जाहिरात बाजी प्रमाणे तुमच्या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, या  ठिकाणी मुली, महिला सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाहीत. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि तुम्ही देशाला राम राज्याची स्वप्न दाखवत आहात, पण या आपल्या रामनगरीत अशा पद्धतीचा गुंडाराज आपल्या आशीर्वादाने सुरू आहे का असा प्रश्न महिलांना पडतो आहे. उत्तर प्रदेशात आपण फिल्म सिटी उभी करणार आहात, परंतु खेदाने म्हणावे लागत आहे की फिल्म सिटी उभी करण्यापेक्षा कायदा सुव्यवस्था शिक्षण या साठी सक्षम पोलीस यंत्रणा, उत्तम प्रकारचे शैक्षणिक संकुल ऊभी करा जेणेकरून पुढील काळात कोणत्याही मुलीवर,महिलांवर अत्याचार होणार नाहीत.

नरेंद्र मोदी जी, अमित शहाजी, स्मृति इराणी तुम्ही सुद्धा यावर काही बोलणार नाहीत कारण तुम्हाला फक्त कंगणाला न्याय द्यावयाचा आहे गोर, गरीब, दलितांना नाही. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

1 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

3 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

4 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

12 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago