दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील वाखारी येथे असणाऱ्या आनंदग्राम सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ.अशोकबाबा
जाधव यांची निवड करण्यात आली
आहे. अशोकबाबा जाधव हे राज्य तमाशा थिएटर संघटनेचे राज्याध्यक्ष असून ते न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
अशोकबाबा यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपण या सोसायटीसाठी बस थांबा व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून या सोयासायटीच्या विविध समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
सामाजिक कार्यात ते कायम अग्रेसर असतात आणि त्याचेच फलित म्हणून त्यांना हा बहुमान मिळाला आहे हे विशेष. आनंदग्राम संस्थेच्या नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष डॉ.अशोबाबा जाधव, उपाध्यक्ष वसंत कांबळे, सचिव धनंजय केतकर, खजिनदार शिवाजी गायकवाड, संचालक अमोल भालेराव, राहुल मिटकरी, अमोल मोने, महेश गायकवाड, उत्तरा पंडित, कल्पना तळेकर, रहीम तुल्ला शेख, कैलास धोत्रे, शीतल स्वामी, योगेश कांबळे, अवधूत देशमुख, एस.परभणकर, एस.कुलकर्णी यांची
निवड करण्यात आली आहे.