Daund : दौंड राष्ट्रवादी मधील मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश



|सहकारनामा|

दौंड : दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादी दौंड शहर अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष चांद बादशहा शेख, उपाध्यक्ष नासिर शेख, शहर सरचिटणीस इरफान शेख तसेच भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस शाकीर शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय( चौफुला, दौंड) येथे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर व दौंड शहर प्रमुख आनंद पळसे यांच्या प्रमुख उपस्थित यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. 

उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना महेश पासलकर म्हणाले, शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष असून तालुक्यात पक्ष करत असलेल्या सामाजिक उपक्रमांनी प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर इन कमिंग सुरू आहे, येथील युवकां साठी शिवसेना पक्ष आकर्षण बनला आहे. पक्ष कोणत्याही जाती, धर्माचे बंधन न मानता तालुक्यातील सामान्य नागरिकांसाठी सर्व समावेशक हिताचे राजकारण करीत असल्याने शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर आणखीनही प्रवेश होणार आहेत. 

यावेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष देविदास दिवेकर, अजय कटारे, इब्राहिम तांबोळी, नवनाथ जगताप, हनुमंत निगडे, अजित फुटाणे,माऊली आहेर, शंकर शितोळे, प्रशांत जगताप आदि उपस्थित होते.