Categories: Previos News

Daund – केडगाव पुनर्वसनच्या प्रश्नांबाबत शिवसेना आक्रमक, तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे

दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील केडगाव आंबेगाव पुनर्वसनच्या विविध प्रश्नांबाबत केडगाव तलाठी यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत नागरिकांनी अनेक वेळा सबंधित कार्यालयाकडे  लेखी व तोंडी तक्रारी देऊन देखिल काहीही उपयोग होत नसल्यामुळे केडगाव पुनर्वसन ग्रामस्थ व शिववसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले आहे. जो पर्यंत वरिष्ठ अधिकारी तलाठी कार्यालयाला भेट देऊन संबधितांवर कार्यवाही करत नाहीत तो पर्यंत सदर तलाठी कार्यालयाचे टाळे खोलणार नाही असा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला आहे.

या बाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी माहिती देताना पुनर्वसन गावठाणांवर व जमिनींवर होत असलेल्या अतिक्रमणांबाबत अनेक वेळा वरिष्ठांना निवेदन दिले आहे. त्यामुळे या बाबत सबंधित महसूल अधिकाऱ्यांनी त्वरीत योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे असे सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago