Daund – ‛या’ कारणामुळे शेतकऱ्यांनी शिवजयंती केली शेतातच साजरी



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील कानगाव येथे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा सोहळा शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरच साजरा केला आहे. 



शेतकऱ्यांनी हा सोहळा शेतात साजरा करण्यामागचे कारण सांगताना राज्य शासनाने शिवनेरीवरती 144 कलम म्हणजे जमावबंदी लावलेली होती. म्हणून शेतकऱ्यांनी शिवजयंती शेतावरच  साजरी करावी व शिवरायांच्या समोर कृषी पंपाच्या वीज बिलाची होळी करावी असे आदेश माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले होते असे सांगितले. 



शिवराज्यामधे  शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असा आदेश आपल्या सैनिकांना देणारे शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कृषी पंपाचे कनेक्शन तोडून शेतकऱ्यांचे उभे पीक जाळण्याचा घाट राज्य सरकार व वीज वितरण कंपनीने घातलेला आहे. म्हणून आज शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवरायांच्या समोर कृषी पंपाच्या वीज बिलांची होळी करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे, कानगावचे सरपंच राहुल चाबुकस्वार, विकास सोसायटीचे चेअरमन अॅड भास्कर फडके, जिल्हा सरचिटणीस सयाजी मोरे कानगाव ग्रामपंचायत सदस्य रमेश गवळी, संतोष शेलार, रामदास पवार, सदाशिव नलवडे, शेतकरी नामदेव फडके,अक्षय निगडे, विकास गवळी, निलेश वाघ, श्री खळतकर, अक्षय चौधरी, श्री निगडे, योगेश गवळी धनंजय कोर्हाळे सह अनेक युवा वर्ग सहभागी झाले होते.