Categories: Previos News

Daund – दौंड’मध्ये शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी



दौंड : सहकारनामा

हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा 95 वा जयंती दिन दौंड शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. 

या निमित्ताने बाळासाहेबांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसैनिक अमोल जगताप याच्या पुढाकाराने होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्पदरात संपूर्ण संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत शिवभोजनाचे वाटप ही करण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारी अनिल सोनवणे, अमोल जगताप,अशोक जगदाळे, हरीश खोमणे, रवी पवार यांनी आपल्या मनोगतातून बाळासाहेबांच्या विचारांवर व कार्यशैलीवर प्रकाश टाकला. 

याप्रसंगी नगराध्यक्षा शितल कटारिया, नगरसेविका पूजा गायकवाड, हेमलता परदेशी, नगरसेवक बादशहा शेख, राजेश गायकवाड, शहानवाज पठाण, वसीम शेख, गौतम साळवे, दत्ताजी शिनोलीकर, संतोष जगताप, राजेंद्र खटी, सचिन कुलथे, गणेश दळवी, निलेश सावंत, नामदेव राहिंज, रुपेश बंड तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

22 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago