Daund : दौंड शहरामध्ये अनेक युवकांचा महेश पासलकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश



दौंड : सहकारनामा

शिवसेना प्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्त शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रेरीत होऊन दौंड शहरातील अनेक तरुणांनी शिवबंधन हातामध्ये बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेश शिवसेनेचे पुणे उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. 

या वेळी दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, शिवसेना दौंड तालुका प्रमुख देविदास दिवेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, युवा सेना समन्वयक समिरजी भोईटे, दौंड शहर संघटक अजय कटारे, उपशहर प्रमुख प्रसाद कदम, अक्षय घोलप, विभाग प्रमुख दत्तात्रय मधुरकर, गणेश झोजे, विक्रांत भोईटे, उपविभाग प्रमुख योगेश झोजे, चेतन लवांडे, निखिल पळसे, संदिप कडू, रोटी गावचे शिवसेना माजी सरपंच दिपकराव भंडलकर इ.शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते