Categories: Previos News

Daund : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत दौंड शहरात नागरिकांची आरोग्य तपासणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहर व परिसरात कोरोना संसर्गाचा मोठा प्रसार झाल्याने व  त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या रोजच वाढत असल्याने दौंड नगरपालिकेच्या वतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत शहरातील सर्व  12 प्रभागांमध्ये आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे.

दौंडकर सुद्धा या मोहिमेला चांगला प्रतिसाद देत आहेत. येथील शिक्षक वर्ग शहरातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. या तपासणीमुळे कोणत्या घरातील व्यक्ती कोणत्या आजाराने बाधित आहे या संबंधीची माहिती तपासणी मोहिमे द्वारे नगरपालिकेकडे उपलब्ध होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरावे, कामानिमित्त बाजारपेठेत आल्यानंतर सुरक्षित अंतराचा अवलंब करावा, वृद्ध व लहान मुलांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सूचना आरोग्य तपासणी करणाऱ्या शिक्षक वर्गाकडून सर्वांना करण्यात येत आहेत. 

कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व्यक्तींची बाजारपेठेत सुद्धा तपासणी करून त्यांनाही  सतर्कतेच्या सूचना शिक्षक देत आहेत. नगरपालिकेने राबविलेल्या आरोग्य तपासणी मोहिमे मुळे शहरातील संसर्गाची  साखळी तूटण्यास नक्कीच मदत होणार आहे. याच मोहिमे प्रमाणे नगरपालिकेने खासदार सुप्रिया सुळे,आमदार राहुल कुल,तालुका आरोग्य विभाग तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयाची मदत घेत शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये कोरोना तपासणी(मोफत) मोहीम राबवावी अशी मागणी दौंडकर करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

7 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

9 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

11 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago