Daund : दौंड तालुका भाजपच्या वतीने केडगाव महावितरण समोर आंदोलन



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज केडगांव ता.दौंड येथे महावितरण कंपनीच्या समोर आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनावेळी दौंड भाजपच्या वतीने सक्तीची विज बिल वसुली थांबवावी, १०० युनिट पर्यतचे विज बिल माफ करण्यात यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

भाजप ने विज ग्राहकाच्या न्याय हक्काच्या मागण्याही त्वरीत मान्य करण्यात याव्यात यासाठी महावितरण कार्यालयासमोर विज बिलाची होळी केली. 

यावेळी दौंड तालुका भारतिय जनता पार्टी अध्यक्ष माऊली (अण्णा) ताकवणे, मा.सभापती शिवाजी आबा दिवेकर, पुणे जिल्हा भा ज पा माजी सरचिटणिस तानाजी दिवेकर, पुणे जिल्हा किसान मोर्चा भा ज पा सरचिटणिस माऊली शेळके, ग्रामविकास आघाडी सहसंघटक गणेश आखाडे, आबासाहेब चोरमले,  यांसह असंख्य कार्यकरर्ते उपस्थित होते.