Categories: Previos News

Daund : दौंडमधील रेल्वे स्थानकाच्या वेंडर्सवर बेरोजगारीची कुऱ्हाड! वेंडर्सना संकटातून बाहेर काढण्यासाठी आ.कुल यांना विनंती



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या व दिल्लीहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सध्या दौंड येथे नव्याने झालेल्या कॉर्ड लाइन रेल्वे स्थानकातून जात आहेत, त्यामुळे मूळच्या दौंड रेल्वे स्थानकावरील स्टॉल धारकांकडे काम करणाऱ्या वेंडर्सना व्यवसाय करणे फारच अडचणीचे आणि गैरसोयीचे होणार आहे.

या गोष्टीमुळे वेंडर्सच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर आर. पी. आय.पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे उपाध्यक्ष सतीश थोरात यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांची भेट घेत येथील वेंडर्सना या संकटातून बाहेर काढण्याची विनंती केली आहे. 

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया तसेच दौंड रेल्वे स्थानकावर व्यवसाय करणारे शेकडो वेंडर्स उपस्थित होते. यावेळी आमदार कुल यांना या संदर्भात निवेदन देण्यात  आले. दौंड रेल्वे स्थानकावर शेकडो वेंडर्स अधिकृतपणे अनेक वर्षापासून चहा,  पाणी, खाद्य पदार्थांची विक्री करीत आहेत. काहींचा तर पिढ्या न पिढ्या हाच व्यवसाय आहे. 

संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे. कोरोना च्या लॉक डाऊन मुळे तीन ते चार महिने रेल्वे सेवा बंद राहिल्याने वेंडर्स व  कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली.

दिनांक 1 डिसेंबर पासून पुणे- दिल्ली रेल्वेसेवा सुरू झाली आहे. परंतु पुण्याहून दिल्लीला व दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या  गाड्या दौंड रेल्वे  स्थानकावर न येता येथे नव्याने झालेल्या कार्ड लाईन वरील स्थानकावर येत आहे.  कॉर्ड लाईन रेल्वे स्थानक मूळ स्थानकापासून जवळपास तीन कि.मी. अंतरावर आहे, तसेच या  आधी या गाड्या दौंड स्थानकामध्ये 25 ते 30 मिनिटे थांबायच्या, परंतु आता रेल्वे हे प्रशासनाने या  गाड्यांना कॉर्ड  लाईन स्थानकावर फक्त दोन मिनिटाचा थांबा दिलेला आहे. 

त्यामुळे येथील 200, 250 वेंडर्सना व्यवसाय करणे अवघड व  नुकसानीचे झाले आहे. पूर्वी सारखा व्यवसाय होणार नसल्याने वेंडर्सच्या कुटुंबियांवर पुन्हा  उपासमारीची  वेळ येणार आहे. त्याच प्रमाणे शहरातील व्यापारी, परिसरातील नागरिक, विद्यार्थी, वृद्ध व महिला  या प्रवाशांना सुद्धा कॉर्ड लाईन स्थानक गैरसोयीचे होणार आहे. हे रेल्वे स्थानक शहरापासून लांबच्या अंतरावर असल्याने रात्रीच्या वेळी दौंडला येणाऱ्या प्रवाशांची लुटमार होणे, छेडछाड होणे अशा घटना होण्याची  शक्यता नाकारता येत नाही.

या  सर्व  गोष्टींचा विचार करून पुणे दिल्ली मार्गावर( व्हाया दौंड) धावणाऱ्या या गाड्या मूळच्या दौंड रेल्वे  स्थानकावरच येण्या बाबत राहुल कुल यांनी रेल्वे  प्रशासनाशी चर्चा करून प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

3 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago