Categories: Previos News

Daund : आ.राहुल कुल यांच्याकडून कोविड योद्धा ‛पोलीस पाटलांचा’ सन्मान



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

कोरोनाचा वाढ़ता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने गावपातळीवर स्थापन केलेल्या समितीमध्ये गाव कामगार पोलीस पाटील यांनी सदस्य / सचिव म्हणून महत्वाची भूमिका बजावत अतिशय चांगले काम केले आहे. त्यांनी ग्रामीण भागात लॉकडाऊनचे पालन करत असताना देखील महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.पोलीस पाटील हे गावाच्या विकासातील व गावात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीचा महत्त्वाचा दुवा असतो. हे बाब ग्राह्य धरून दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी तालुक्यातील पोलीस पाटील बंधू भगिनींची भेट घेऊन त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. 

यावेळी आमदार कुल यांनी बोलताना पोलीस पाटलांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडून त्या मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत, त्यांच्या मानधन वाढीचा प्रश्न  नुकताच मार्गी लागला असून त्याच प्रमाणे त्यांच्या इतर प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बाळासाहेब शिंदे पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघ, सौ. कांचन कुल जिल्हाध्यक्ष भाजप महिला आघाडी, माऊली ताकवणे तालुकाध्यक्ष दौंड भाजप,  विकास शेलार संचालक भीमा पाटस,  राळे पाटील कार्यकारी अध्यक्ष पुणे जिल्हा पोलिस पाटील संघ, संदिप काळे पाटील दौंड तालुका अध्यक्ष,  सुदाम गोसावी पाटील दौंड तालुका उपाध्यक्ष, निळकंठ थोरात पाटील, लक्ष्मण कदम पाटील,  अविनाश शेंडगे पाटील, हनुमंत हंडाळ यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

3 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

4 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

6 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

13 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago