Daund : दौंडमध्ये गणेश जयंती सोहळा उत्साहात संपन्न



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

शहरातील सूर्यमुखी गणेश मंदिर ट्रस्ट (कुंभार आळी) च्या वतीने गणेश जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी गणेशाची विधीवत पूजा करण्यात आली. जन्म  सोहळ्याच्या आरतीचा मान श्री व सौ आकाश झोजे यांना देण्यात आला. 

जयंती निमित्ताने विठ्ठल मंदिर, गीताई मंडळाच्या वतीने विष्णू सहस्त्रनाम सोहळा पार पडला. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या दि.16 फेब्रु, रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सूर्यमुखी गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. 

गणेश भक्त अनिल सोनवणे,आकाश झोजे, दीपक शिर्के,उमेश शितोळे, उद्धव घोडके, योगेश चुंबळकर, योगिता सोनवणे, वंदना घोणे, शुभांगी झोजे, वैशाली शिर्के, शोभा चुंबळकर, मंगल झोजे, कटारे आदींच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.