दौंड : सहकारनामा
केडगाव येथे असणाऱ्या सद्गगुरू चौरंगीनाथ महाराज मठ (नवनाथ मंदिर, पहाड) येथे धर्मनाथ बीज व अखंड हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने केडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व आमदार दौंंडचे आमदार राहुल कुल यांच्या सूचनेनुसार पद्मावती तळे ते नवनाथ मंदिर (पहाड) येथे स्वतंत्र पाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
या पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन दि.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता करण्यात आले. यावेळी केडगावचे सरपंच अजित शेलार पाटील, उप सरपंच अशोक हंडाळ ग्रामविकास अधिकारी डोळस भाऊसाहेब यांनी त्यांचे स्वागत केले.
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आमदार राहुल कुल यांनी केडगाव व तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून कोणतेही गाव हे विकासापासून वंचित राहणार नसल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला केडगाव पंचक्रोशीतील विविध मान्यवर, भाजप पदाधिकारी, भाविक मंडळी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.