Categories: Previos News

Daund : ‛दौंड’मधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रेल्वे प्रवासासाठी प्रयत्न करणार असल्याची अमिताभ गुप्ता यांची ग्वाही, आमदार ‛राहुल कुल’ यांचे प्रयत्न सत्कारणी लागण्याची चिन्हे



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाइन

 दौंड- पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासास लवकरच अनुमति मिळणार असल्याचे माजी नगराध्यक्ष योगेश कटारिया यांनी सांगितले. 

दौंड- पुणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांची व दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची बैठक आयोजित केली होती, पुणे लोणावळा लोकल मधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची अनुमति देण्यात आली आहे त्याच धर्तीवर दौंड मधील सरकारी कर्मचाऱ्यांनाही रेल्वेतून प्रवासाची मुभा मिळाली पाहिजे या  संदर्भामध्ये बैठकीत चर्चा झाली. 

त्या अनुषंगाने दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पुणे विभागाचे नोडल ऑफिसर अमिताभ गुप्ता (पोलीस आयुक्त पुणे) यांची भेट घेत दौंड प्रवासी संघाच्या मागणी बाबत चर्चा केली. बैठकीमध्ये दौंड -पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. दौंड प्रवासी संघाच्या मागणीचे निवेदन अमिताभ गुप्ता यांना यावेळी देण्यात आले. 

दौंड, पुणे प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवासास लवकरच अनुमति देण्यासाठी पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांचे बरोबर चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन अमिताभ गुप्ता यांनी संघास दिले आहे. निवेदन देते वेळी योगेश कटारिया, सुनील शर्मा, गणेश शिंदे, विकास देशपांडे, आयुब तांबोळी, राहुल ताटे आदि उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

14 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago