दौंड : सहकारनामा
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप सभापतीपदी केडगावचे राजेंद्र सखाराम जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
राजेंद्र जगताप हे जवळपास 20 वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.
राजेंद्र जगताप यांची उप सभापती पदी निवड झाल्याने केडगावमध्ये समाधान व्यक्त केले जात असून त्यांच्या निवडीनंतर केडगाव गावठाणातील ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तर त्यांच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला आहे.