दौंड | वाखारी विका. सोसायटीच्या ‘तीन’ सदस्यांचे ‘निलंबन’, जेष्ठ नेते धनाजी शेळके यांचेही नाव असल्याने खळबळ

दौंड : दौंड तालुक्यातील वाखारी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या तीन सदस्यांचे संचालक पद निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांच्याकडून मिळत असून दि.28/11/2023 रोजी त्यांनी याबाबत आदेश दिला आहे.

नेमके काय आहे प्रकरण..

वाखारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या (वाखारी, ता.दौड, जि.पुणे) ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतूदीनुसार नोंदणी झालेली सहकारी संस्था आहे. या संस्थेचे चेअरमन/सचिव वाखारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था दौंड या कार्यालयाकडे वाखारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चे संचालक तुषार राजेंद्र गायकवाड, धनाजी नागुजी शेळके व वंदना दत्तात्रय शेळके यांनी सदर संस्थेचे कर्ज घेतले असुन त्यांचे कर्ज थकलेले आहे. त्यामुळे ते तीन संचालक सदर संस्थेचे थकबाकीदार झाले असल्याने त्याबाबतचा दि.१८/०८/२०२३ रोजीचा संस्थेने पत्रासोबत दाखला जोडून या सदस्यांवर पुढील योग्य ती कार्यवाही करणेबाबत विनंती केली होती. त्यानंतर या तक्रारीच्या अनुषंगाने दि.१०/१०/२०२३, ३०/१०/२०२३ व १६/११/२०२३ रोजी या कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आलेली होती.

थकबाकीदारांनी अश्या प्रकारे आपले म्हणणे मांडले, मात्र.. सहाय्यक निबंधक यांनी दिलेल्या तारखेला सदर सुनावणीस जाबदेणार वंदना दत्तात्रय शेळके या गैरहजर राहिल्या तर धनाजी नागुजी शेळके, तुषार राजेंद्र गायकवाड हे दि.१०/१०/२०२३ हजर राहिले होते. त्यांनी यावेळी आपला लेखी खुलास सादर केला व सोबत थकबाकी भरले बाबतचा संस्थेचा दाखला सादर केले होता व दि.३० ऑक्टोबर आणि १६ नोव्हेंबर रोजी ते गैरहजर होते. तर जाब देणार वंदना दत्तात्रय शेळके या दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी वाखारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या वाखारी या संस्थेच्या थकबाकीदार आहेत असे दिसून येत होते. तर जाबदेणार धनाजी नागुजी शेळके आणि तुषार राजेंद्र गायकवाड हे दि. १८/०८/२०२३ रोजी वाखारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या वाखारी, ता.दौंड, जि. पुणे या संस्थेचे थकबाकीदार होते असे पत्रात म्हटले आहे.

सहाय्यक निबंधक यांचा आदेश आणि खळबळ.. मिळत असलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६० चेकलम ७३ क अ मधील तरतुदी अन्वये हर्षित तावरे, (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दौंड, जि.पुणे) यांनी, त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार वाखारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. (वाखारी, ता.दौंड, जि.पुणे) या संस्थेच्या संचालिका वंदना दत्तात्रय शेळके, संचालक, धनाजी नागुजी शेळके, व तुषार राजेंद्र गायकवाड यांना महाराष्ट्र सहकारी संस्था
अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ (१) (अ) अन्वये निरर्हता प्राप्त झाल्याने त्यांना वाखारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या वाखारी (ता.दौंड, जि.पुणे) या संस्थेच्या समितीचा सदस्य म्हणून अपात्र करत आहे असा आदेश दिला. तसेच उक्त अधिनियमाचे कलम ७३ क अ (२),(३) अन्वये ते समितीचा सदस्य बंद झाल्या पसून पुढील पाच वर्षाच्या मुदतीचा कालावधी समाप्त होईपर्यंत समिती सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास, पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास, पुन्हा स्विकृ होण्यास किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाही असेही आदेशात म्हटले.

‘थकबाकी’ भरली, मात्र तरीही या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने निलंबन

सदर प्रकरणामध्ये सोसायटीचे सदस्य वंदना दत्तात्रय शेळके, धनाजी नागुजी शेळके आणि तुषार राजेंद्र गायकवाड हे वाखारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. या संस्थेचे थकबाकीदार होते असे दिसून येते, त्यांनी नंतर थकबाकीची रक्कम भरणा केली असली तरीही Pundalik Vs District
Deputy Registrar Co-op Soc. Chandrapur हा मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा निकाल विचारात घेता थकबाकीची रक्कम भरणा केली असली तरी देखील संचालकास पदावर रहाता येत नाही असे सहाय्यक निबंधक यांनी दिलेल्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.

निलंबित सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष याबाबत वाखारीचे जेष्ठ नेते धनजीभाऊ शेळके यांना माहिती विचारली असता मी आउट ऑफ स्टेशन आहे त्यामुळे मला याबाबत काही कल्पना नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता या निलंबनाबाबत हे सदस्य काय भूमिका घेतात आणि वरिष्ठ पातळीवर दाद मागतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.