दौंड – बळजबरी ‘खतना’ प्रकरणातील डॉक्टरसह दोघांना ‘अटक’, सर्व 3 आरोपी अटकेत

दौंड : दौंड शहरातील एका इसमाची बळजबरीने खतना केल्याच्या आरोपातील मुख्य आरोपी कुमेल कुरेशी आणि खतना करणाऱ्या डॉ.खान साहब या खतना करणाऱ्या व्यक्तीला दौंड पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुमेल कुरेशीला सोलापूर आणि खानसाब याला अहमदनगरमधून पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात असिफ शेख या आरोपीला सर्वात प्रथम अटक करण्यात आली होती त्यानंतर काल रात्री या दोन्ही आरोपिंना अटक करण्यात आल्याने आता अटक आरोपिंची संख्या तीन झाली आहे. असिफ शेख यास अटक करण्यात आल्यानंतर त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज या दोन्ही आरोपिंना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोह. सुभाष राऊत आणि पो.कॉ. अमोल देवकाते यांच्या पथकाने आरोपिंना अटक केली आहे.