दौंड तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूक – 17 जागेपैकी राष्ट्रवादीचे 14 संचालक बिनविरोध तर ‘या’ 3 ठिकाणी लढत होणार

दौंड : दौंड तालुका खरेदी-विक्री संघाच्या 17 जागेपैकी 14 जागेवर माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखली राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 उमेदवार (संचालक) बिनविरोध निवडून आले आहेत तर पाटस, वरवंड आणि पिंपळगाव या 3 जागेंवर निवडणूकीचा सामना पहायला मिळणार आहे. संचालक बिनविरोध झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी दिली आहे.

• राष्ट्रवादीचे बिनविरोध उमेदवार आणि गाव
कासुर्डी – सदानंद दोरगे
खामगांव – विजय नागवडे
केडगाव – ज्ञानेश्वर शेळके
पारगाव – नानासाहेब जेधे
नानगांव – विश्वास भोसले
दौंड – जयवंत गिरमकर
रावणगाव – गजानन गुणवरे
• ब वर्ग वयक्तिक प्रतिनिधी –
प्रेमनाथ दिवेकर.
पुरुषोत्तम हंबीर
• महिला प्रतिनिधी –
सौ.सविता ताडगे
सौ.नंदा ताकवणे

• अनुसूचित जाती, जमातीतील प्रतिनिधी –
विकास कांबळे

•इतर मागासवर्गीय प्रतिनिधी –
संपत शेलार

• विमुक्त जाती भटक्या जमाती / विशेष मागासवर्गीय प्रतिनिधी
आश्रू डुबे

अशी बिनविरोध झालेल्या 14 संचालकांची नावे असून पाटस, वरवंड आणि पिंपळगाव या 3 ठिकाणी खालील उमेदवारांमध्ये लढत होईल.
पाटस – शिवाजी ढमाले (राष्ट्रवादी) विरुद्ध रंजना भागवत (भाजप)
वरवंड – संजय धायगुडे (राष्ट्रवादी) विरुद्ध सचिन सातपुते (भाजप) विरुद्ध लक्ष्मण दिवेकर (अपक्ष)
पिंपळगाव – मोहन टुले (राष्ट्रवादी) विरुद्ध नारायण जगताप (अपक्ष) अशी लढत होणार आहे.