अख्तर काझी
दौंड : दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. 12वी वाणिज्य (1986) व बी कॉम (1989) वर्गातील विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. 35 वर्षांनी सर्व मित्र पुन्हा एकत्र आले व त्यांनी नानविज येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.
स्नेह मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ.तु. ह. दाते सर व नानवीज पोलिस अधीक्षक , प्राचार्य रामचंद्र केंडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. दोन्ही प्राचार्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. स्नेह मेळाव्याला दौंड वाणिज्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रा. दिलीप सावंत , प्रा. डॉ .रामदास रसाळ , प्रा. डॉ. शरद पवार ,प्रा. डॉ. शशांक पोळ , प्रा.डॉ. संजय इंगळे , प्रा. डॉ. शामराव थोरात , तसेच रखमाजीधावडे, रविंद्र उबाळे, सुरेश जोगदंड, नितीन महामुनी यांनी ही माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात उपस्थिती दर्शवित 35 वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच सेवानिवृत्त विद्यार्थी राजेंद्र थोरात, नामदेव राठोड, दिपक मोरे, फ्रॅन्सिस पिंटो, रावसाहेब संकपाळ यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. सदाशिव शिरगावे यांना स्मृतिचिन्ह, गणेशाची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित विद्यार्थिनींचा सत्कार केंडे मॅडम व रसाळ मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. निर्मला फासे, ज्योती जोशी, निलम अत्रे, निर्मला फड, आरती कुलकर्णी, उत्कर्ष वाटेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संदीप वागजकर, चांगदेव शेलार, शिवाजी परकाळे, सुधीर डेंगळे, दिपक मोरे, ॲड अरविंद धोत्रे, ॲड. नवनाथ जाधव, अजय जठार व दिलीप सोनावणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद दीक्षित यांनी केले, आभार सुभाष कदम यांनी मानले.