Categories: पुणे

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे 33 कोटि 50 लाखांचे काम सुरु, आमदार राहुल कूल यांच्या पाठपुराव्याने झाला होता निधी मंजूर

दौंड : दौंड तालुक्यातील गोर गरिब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, वैद्यकीय चाचण्या माफक दरात उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे दौंडचे आमदार राहुल कूल यांनी पाठपुरावा करून २०१८ साली दौंड उपजिल्हा रुग्णालयातील ५० खाटा वरून १०० खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन व विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ३३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधीस मान्यता मिळविली होती.

सध्या दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे बांधकामास सुरुवात झाली असून हे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. तसेच कोव्हीड – १९ कालावधीत रुग्णांना ऑक्सिजन पुरवठामध्ये आलेली आव्हाने लक्षात घेता दौंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकल ग्रेड ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव व जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे यांचेकडे केली होती. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे सुमारे ४१ लक्ष रुपये खर्चाची ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आलेली आहे.

आमदार राहुल कूल यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियांता हरिश्चंद्र माळशिकारे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्या समवेत दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीच्या कामाची व ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्रणेची पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक श्री. प्रेमसुखजी कटारिया व दौंड शहरातील सहकारी उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

5 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

7 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago