Categories: राजकीय

दौंड राष्ट्रवादीत सच्च्या कार्यकर्त्यांना नव्हे चमचेगिरी, हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्व, वेळ पडली तर ‛यांच्या’सोबतही जाऊ – बादशाह शेख

अख्तर काझी

दौंड : दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सच्या कार्यकर्त्याला किंमत राहिलेली दिसत नसून चमचेगिरी व हुजरेगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गरज आहे हे दिसत असल्याने व खासदार सुप्रिया सुळे व मा.आमदार रमेश थोरात यांनी दौंड मधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये व पुणे येथे झालेल्या बैठकीत अपमान केल्याने नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मी राष्ट्रवादी बरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे असे स्फोटक विधान पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते बादशाह शेख यांनी केले आहे. शेख यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची मालिकाच सादर केली.

आपण तडकाफडकी हा निर्णय का घेतला याबद्दल बोलताना बादशाह शेख म्हणाले की, दि.5 ऑक्टोबर रोजी शहरामध्ये दौंड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थित कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मा. आमदार रमेश थोरात, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, ता. अध्यक्ष आप्पासो पवार, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीतील अडी अडचणीच्या अनुषंगाने आपले विचार मांडावेत अशा सूचना करण्यात आल्या होत्या, म्हणून मला बोलायची संधी मिळाल्यानंतर मी माझे मत व्यक्त करताना सुप्रिया सुळे यांना अशी माहिती दिले की, विद्यमान आमदार राहुल कूल, प्रेमसुख कटारिया व त्यांचे पुत्र योगेश कटारिया यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये शेकडो लोकांना नोकऱ्या लावल्या आहेत, मात्र राज्यात आपली सत्ता असताना देखील खासदार व माजी आमदार यांनी अद्याप शहरातील एका सही नोकरी लावलेली नाही. त्यामुळे आम्ही पक्षासाठी मतदान मागत असताना आम्हाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यावर आपले म्हणणे काय आहे असा प्रश्न मी उपस्थित खासदार व सर्वच पदाधिकाऱ्यांना विचारला आणि सन 1985 पासून आजतागायत च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये दौंड शहराने पवार साहेबांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमीच मताधिक्य दिलेले आहे. परंतु खा. सुळे यांच्या महादेव जानकर विरोधातील लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्याबरोबर राहुल कूल, रमेश थोरात, वीरधवल जगदाळे, आप्पासो. पवार काम करीत असताना देखील दौंड तालुक्यातून तुम्ही 25 हजार 500 मतांनी मागे पडलात. असे असताना शहरात मात्र आम्ही तळागाळातील कार्यकर्त्यांना बरोबरीला घेऊन शहरातून 2500 मतांचे लीड घेऊन दिले. तरी सुद्धा तुम्ही या शहरातील आपल्या मतदारांसाठी काहीच करीत नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. तुम्ही, तुमच्या शैक्षणिक संस्था बारामती, इंदापूर तालुक्यामध्ये मोठाली कॉलेज सुरू करता, दौंडला मात्र नेहमीच उपेक्षित ठेवले आहे, त्यामुळे आमच्या शहरातील विद्यार्थ्यांना इतर शहरांमध्ये शिक्षणासाठी भटकावे लागत आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? असा ही प्रश्न उपस्थित केला, बारामतीला रेल्वेमार्गावर तुम्ही उड्डाणपूल दिला व दौंडच्या लोकांना मात्र तिसऱ्या गटारीतून जाण्यासाठी मोरीची सोय करून बोळवण केली, शहरातील सेंट्रल बिल्डिंग वगळता पक्षाने शहरासाठी काहीच केलेले नाही अशी कबुलीही बादशाह शेख यांनी यावेळी दिली.
तसेच नगराध्यक्ष शीतल कटारिया व नगरसेवक बबलू कांबळे व इतर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांच्या विरोधात दि.18/8/2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या, या याचिकेच्या सुनावणी दरम्यान (प्रकरण न्यायप्रविष्ट असताना) 14 दिवसानंतर दि.2/9/2021 रोजी आमदार राहुल कुल हे याच प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी यांना चौकशी समिती स्थापन करण्यास लावतात, राज्यात आपलेच म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार असताना, आमचे पालकमंत्री असताना आम्ही मात्र हा सर्व प्रकार हतबल होऊन फक्त पाहत बसतो. आम्हाला पक्षाकडून याकामी काहीच मदत मिळत नाही. उच्च न्यायालयात आमच्या विरोधात कूल व कटारिया तीन-तीन दिग्गज वकील उभे करतात, आम्हाला आमच्या पक्षाकडून साधा वकील दिला जात नाही व जो वकील आम्ही नियुक्त करतो त्याची फी ऐकूनच आमचा जीव जातो की काय अशी परिस्थिती होते. पक्षाकडून एक नया पैसा या कामासाठी आम्हाला दिला जात नाही हे खासदारांना सांगणे ही माझी चूक होती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत आम्ही प्रत्येक निवडणुकीत पक्षासाठी म्हणून कटारिया यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून काम करतो म्हणून पक्षाला शहरात फायदा होतो. दौंड नगरपालिका निवडणुकीत कटारिया आपल्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव करतात, तसेच मागील काही वर्षापूर्वी खासदार सुप्रिया सुळे नगरपालिकेतील कटारिया गटाच्या कारभारा विरोधात दौंड नगरपालिके समोर चार तास उभे राहून धरणे आंदोलन करतात, त्यावेळेस हे कटारिया आमच्या खासदारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना अपमानित करतात, असे असतानाही आमच्या पक्षाचे दिग्गज प्रेमसुख कटारिया यांना भेटावयास व त्यांना शुभेच्छा देण्यास त्यांच्या घरी जातात ही राजकारणाची कसली पद्धत असे मुद्दे मी बैठकीत मांडले त्यामुळे खासदार प्रचंड संतापल्या. कार्यकर्त्यांचे ऐकुनच घ्यायचे नसेल तर मेळावा भरवायचा कशाला. माझ्या राजकीय जीवनातील जवळपास 30 ते 35 वर्ष मी पवार कुटुंब व पक्षासाठी व्यतीत केली, पक्षाच्या हिताच्या गोष्टी मी खासदारांना सांगत होतो परंतु त्यांनी त्या ऐकल्या नाहीत आणि उगीचच संतापल्या म्हणून मी माझ्या समर्थकांना घेऊन मेळाव्यातून बाहेर पडलो होतो.

मी नाराज झालो आहे हे लक्षात आल्यानंतर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी माझ्या घरी येऊन सांगितले की उद्या पुणे येथे बैठक घेतली जाणार आहे असे सांगून मला त्या बैठकीला नेले. परंतु बैठक सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माझ्याशी बोलायचे तर सोडाच माझ्याकडे बघितले सुद्धा नाही व काही मिनिटातच बैठक संपविली. ज्या बादशहा शेख याने 30 ते 35 वर्ष राष्ट्रवादीसाठी पणाला लावली त्याचा अपमान खासदार सुळे व रमेश थोरात यांनी केला. हा झालेला अपमान मी कदापि सहन करू शकत नाही म्हणून यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम न करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. पक्षाला खऱ्या कार्यकर्त्याची गरज उरलेली नसून चमचेगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गरज आहे असे वाटत असल्याने पक्षावर नाराज होत त्यांच्यासोबत न जाण्याचा अंतिम निर्णय मी घेतलेला आहे.

कटारिया गटातून नुकतेच आमच्या गटात आलेले तीन नगरसेवकां सहीत एकूण 12 ते 14 नगरसेवक यांनी ते माझ्या निर्णया सोबत असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून कोणा सोबत काम करायचे याचा निर्णय सर्वांच्या विचाराने घेणार असल्याचे ही बादशहा शेख यांनी सांगितले. प्रेमसुख कटारिया यांनी जर सन्मानाने बोलावून एकत्र काम करण्याची ऑफर दिली तर त्यांच्याबरोबर जाण्याचीही माझी तयारी आहे, मला कोणाचीही एलर्जी नाही हे सांगण्यासही बादशहा शेख विसरले नाहीत.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

11 मि. ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

13 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

15 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

17 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago